मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कॅरम स्पर्धेचे यशस्वी आयोजन

मुरगूड (शशी दरेकर): ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नुकतीच कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महादेव वागवेकर यांनी एकेरी गटात, तर किशोर पाटील व अशोक डवरी यांनी दुहेरी गटात बाजी मारली.

Advertisements

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य महादेव कानकेकर आणि अविनाश चौगले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा गौरव करण्यात आला. प्रकाश ढाणे व प्रदीप बागल यांनी पंच म्हणून काम पाहिले, तर जयवंत हावळ यांनी आभार प्रदर्शन केले.

Advertisements

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे :

स्पर्धा प्रकारप्रथमद्वितीयतृतीय
एकेरीमहादेव वागवेकरकिशोर पाटीलतानाजी डवरी
दुहेरीकिशोर पाटील – अशोक डवरीरामचंद्र सातवेकर – सुरेश दरेकरतानाजी डवरी – सदाशिवराव एकल
  • PROFESSIONAL DESIGN: Tournament-grade carrom board with premium matte finish playing surface for enhanced gameplay and p…
  • COMPLETE SET: Comprehensive package includes practice coins, striker, and powder for an authentic carrom playing experie…
  • PLAYING SURFACE: Smooth, well-finished surface ensures consistent coin movement and professional-level practice sessions
₹2,699

Leave a Comment

error: Content is protected !!