मुरगूड (शशी दरेकर) : सोनाळी ता. कागल येथील वरद पाटील खुन प्रकरणात आरोपी असणाऱ्या कुटुंबीयातील विठ्ठल गुंडा वैद्य यांनी आपल्यावर गावातीलच ११ जणांच्या जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न करुन पत्नीसह आपल्यास धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची फिर्याद मुरगूड पोलिसात दिली आहे. यात प्रकरणी मुरगूड पोलिसात ११ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सोनाळी, ता.कागल येथे १८ रोजी रात्री विठ्ठल गुंडा वैद्य यांच्या घराच्या दारात पोर्चवर कांही जमाव आला. संगणमताने मारहाण करण्याच्या उद्देशाने दहशत पसरविण्यासाठी दंगा करुन, शिवीगाळ व धमकी देऊन या जमावाने वैद्य यांच्या पत्नीला धक्काबुक्की व शिवीगाळ केली. अशी फिर्याद दिल्यामुळे दत्तात्रय रामचंद्र पाटील, शंकर रामचंद्र पाटील, गणपती रामचंद्र पाटील, रविंद्र गणपती पाटील, सुरेश महादेव रेडेकर(खांडेकर), समाधान तापेकर (पुर्ण नाव माहीत नाही), गिता सदाशिव पाटील, वत्सला मारुती खोळांबे, संपदा शंकर पाटील, रुक्मिनी दतात्रय पाटील, सारीका बाळासो पाटील, साताबाई सुरेश रेडेकर (सर्व रा. सोनाळी, ता. कागल) या अकरा जणांविरोधात मुरगूड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा अधिक तपास पो. स. इ श्री. ढेरे करीत आहेत.