सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर; सभासदांना १५% लाभांश देण्याची घोषणा
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील आपुलकी, जिव्हाळा व विश्वासाबरोबरच सभासद, ग्राहकांच्या पसंतीत उतरलेली मुरगूडची -सुवर्ण महोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्थेची ५७ वार्षिक सर्व साधारण सभा अत्यंत शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अजेंड्या वरील सर्वच्या सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. संस्थेच्या प्रधान कार्यालयात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी अनंत फर्नाडीस होते.
संस्थेला अहवाल सालात २ कोटी ३१ लाख ५५ हजार इतका विक्रमी नफा झाल्याचे सभाध्यक्ष श्री अनंत -फर्नांडीस यांनी सांगितले. सभासदांना १५ % लाभांश देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. लाभांश वाटपासाठी २४ लाख ९४ रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी संस्थापक संचालक जवाहलाल शहा म्हणाले गेल्या अहवाल सालात ३९६ कोटी १५ लाखाचा विक्रमी व्यवसाय संस्थेने केला आहे. त्यात ७५ कोटी ३६ लाखांच्या ठेवीच्या आधारे ५६ कोटी ४९ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. त्यापैकी ३५ कोटी ४२ लाख सोने तारण कर्ज आहे.
ज्येष्ठ संचालक पुंडलिक डाफळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले संस्था महोत्सव निधीतून ५१ लाखांच्या दिपावली भेट वस्तू सभासदांना देण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. संस्थेच्या कूर शाखेची स्वतःच्या जागेत ५४ लाखांची सर्व सोयीनी युक्त स्वमालकीच्या अद्ययावत अशा इमारतीचे बांधकाम सद्या सुरु आहे.
यावेळी सभासदांचे पाल्य आणि सन्माननीय सभासदांच्या हस्ते दिप प्रज्वलनासह लक्ष्मी नारायणच्या फोटोचे पूजनही करण्यात आहे. इयता दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाच्या सभासदांच्या पाल्यांचा संस्था सभापती उप-सभापती व संचालकांच्या हस्ते पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला . तसेच दहावी व बारावीत प्रथम आलेल्या पाल्यांना कै शंकर गणपती शिरगावकर यांचे स्मरणार्थ दतात्रय शिरगावकर यांचेकडून रोख ५०० रुपये , प्रशस्ती पत्र व गौरव चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
मुरगूडला महापूर आला होता. यावेळी शहराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून विद्युत कंपणीच्या सेवकांनी विद्युत पुरवठा सुरळीत केला . त्याबद्दल सर्वश्री शहाजी खतकर, सतिश रणवरे, सागर गुजर, भिकाजी चौगले, सतिश कोळी, वैभव लोंढे ऑडीटर विश्वास कारंडे यांचाही संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
संस्थेचे जनरल मॅनेजर नवनाथ डवरी यांनी अहवाल वाचन केले. यावेळी अहवालावर झालेल्या चर्चेत सभासद सर्वश्री विलास गुरव , विनायक हावळ , ईश्वरा कुंभार रामचंद मगदूम , सुदर्शन हुंडेकर , मंगेश पाटील , नामदेव शिंदे , पांडूरंग दरेकर , हरी वंदूरे , दिलीप शिंदे ,आप्पासो पाटील , किरण तिप्पे यांनी भाग घेतला. जनरल मॅनेजर नवनाथ डवरी व व्यवस्थापकीय मंडळाने प्रश्नांची समर्पक उत्तरे व शंका समाधान केले.
सभेला संचालक मंडळाचे सदस्य सवश्री दतात्रय तांबट, रविंद्र खराडे, किशोर पोतदार, सौ. सुनिता शिदे, सौ. सुजाता सुतार,चंद्रकान्त माळवदे, रविंद्र सणगर, दतात्रय कांबळे, तज्ञ संचालक जगदिश देशपांडे, श्रीमती भारती कामत यांच्यासह सचिव मारुती सणगर शाखाधिकारी मनिषा सुर्यवंशी ( मुख्य मुरगूड शाखा ) राजेंद भोसले ( कापशी) रामदास शिवूडकर ( सावर्डे बु) अनिल सणगर ( कूर) अंतर्गत हिशोब तपासणीस श्रीकांत खोपडे यांच्यासह संस्थेचे सर्व सेवक वृंद, सभासद वर्ग उपस्थित होते. शेवटी व्हाईस चेअरमन विनय पोतदार यांनी आभार मानले .