मुरगूडच्या फूटबॉल २०२५ चषक  स्पर्धेत  मुरगूड फूटबॉल क्लब प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर )

    मुरगूड फूटबॉल २०२५ चषक स्पर्धेत मुरगूड फूटबॉल क्लबने प्रथम क्रमांक पटकाविला.
       फूटबॉल स्पर्धेत सुमारे १६ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील अंतिम सामना मुरगूड फूटबॉल क्लब व गडहिंग्लज फूटबॉल क्लब यांच्यात झाला. या सामन्यात मुरगूड फूटबॉल क्लबने – ३  विरुद्ध १ गोलने  गडहिंग्लज संघास हरविले व अजिंक्यपद पटकावले. या सामन्यात मुरगूड संघातील रोहित मोरबाळे यांने दोन गोल केले तर एक गोल अभिजित गुरवने नोंदवला.
   
      स्पर्धेतील दुसरा क्रमांक गडहिंग्लज क्लबला मिळाला. तृतीय व चौथा क्रमांक अनुक्रमे गारगोटी फूटबॉल क्लब व सुळकूड फुटबॉल क्लब ने पटकावले.

Advertisements


         मॅन ऑफ सिरीजचा बहुमान  रोहित मोरबाळे ( मुरगूड फूटबॉल क्लब ) यास मिळाला इतर वैयक्तिक बक्षिसाचे मानकरी असे बेस्ट स्ट्राइकर – अमोल चौगले ( गारगोटी फूटबॉल क्लब ) बेस्ट मिलफिल्डर – प्रसाद पोवार (गडहिंग्लज फूटबॉल क्लब ) बेस्ट डिफेन्स – ओंकार मांगोरे (मुरगूड फूटबॉल क्लब ) बेस्ट गोलकिपर – मंथन पाटील (सुळकूड फूटबॉल क्लब ) स्पर्धा पंच म्हणून ऋषी दाभोळे व निरंजन कामते यांनी काम पाहिले. स्पर्धा उदघाटन मयूर सणगर व निशांत जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी राजीव जाधव, पृथ्वीराज चव्हाण, संतोष हिरुगडे, देवेन राऊत प्रमुख उपस्थित होते. बक्षिस वितरण शिवाजी मोरबाळे व राजेश गोधडे यांच्याहस्ते करण्यात आले.

Advertisements


   यावेळी इंद्रजित डेळेकर, सुनिल घाटगे व प्रविण मांगोरे उपस्थित होते.

Advertisements

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!