मुरगूड (शशी दरेकर ) : राज्य संवर्ग अधिकारी नगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांच्या विविध मागण्याबाबत आठ दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे .
जूनी पेन्शन योजना लागू करा ‘ कर्मचारी सेवार्थ आयडी दया ‘ मुख्याधिकारी पदावर पदोन्नती २० टक्के वरून ६० टक्के करावी राजपत्रीत दर्जा दयावा. १० .२० . ३० आश्वासीत प्रगती योजनेची अमलबजावणी करावी. डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना लागू करावी यासह इतर मागण्यासंबंधी राज्यातील ३५० नगरपरिषद व नगरपंचायत मधील ६० हजार कर्मचाऱ्यांनी दि. २९ ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
मुरगूड पालिकेतील सुमारे ३० अधिकारी व कर्मचारी या बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत बहुतांशी अधिकारी हे विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आहेत त्यामुळे त्याचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. पालिका कामे ठप्प झाली असल्याचे दिसून आले.
काम बंद आंदोलनाचा आजचा आठवा दिवस होता अजूनही राज्य सरकारने पालिका कर्मचारी महासंघाबरोबर चर्चा केलेली नाही त्यामुळे संप चिघळण्याची शक्यता आहे . दोन दिवसात निर्णय न झाल्यास मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन होणार आहे.
मुरगूड नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात पालिका कर्मचाऱ्यांनी कामगार एकजूटीच्या घोषणा देत मागण्यांचा फलक झळकावत मागण्या मान्य करण्याचा इशारा बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी असणाऱ्या संवर्ग अधिकारी व पालिका कर्मचाऱ्यांनी दिला.
या आंदोलनात पालिका कार्यालय अधिक्षक स्नेहल पाटील, अभियंता पिंपळे मॅडम ‘ कर निरीक्षक रमेश मुन्ने ‘ लेखापरीक्षक अनिकेत सुर्यवंशी ‘ पाणीपुरवठा विभागप्रमुख रविंद्र आतीवाडकर ‘ आरोग्य निरीक्षक सचिन भोसले ‘ जयवंत गोधडे व रणजित निंबाळकर आदिसह कर्मचारी सहभागी झाले आहेत .
What i do not understood is in truth how you are not actually a lot more smartlyliked than you may be now You are very intelligent You realize therefore significantly in the case of this topic produced me individually imagine it from numerous numerous angles Its like men and women dont seem to be fascinated until it is one thing to do with Woman gaga Your own stuffs nice All the time care for it up