मुरगूड (शशी दरेकर) – परवा कोल्हापूर येथे उसळलेल्या जातीय. दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आज मुरगूड पोलीसांनी शहरातून संचलन केले. मुरगूड पोलीस स्टेशनचे स.पो.नि. विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले.
शहराच्या मुख्य बाजारपेठ, एस.टी. स्टँड, तुकाराम चौक मार्गे गावभागातील प्रमुख मार्गावरुन सशस्त्र पोलीसांनी हे पथसंचलन केले. मुरगूड शहर , सेनापती कापशी , मळगे बु॥, बोरवडे , चिखली , माद्याळ्, बिद्री, वाळवे , ही गावे संवेदनशिल आहेत . कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पार पडलेल्या या संचलनात मुरगूड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे , यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार ढेरे यांच्यासह १५ पोलिस अंमलदार , व१५ होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते .
Very interesting information!Perfect just what I was searching for!!