करनूर तंटामुक्त अध्यक्षपदी महंमद शेख तर उपाध्यक्षपदी विश्वास चव्हाण यांची निवड

कागल(विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी महंमद बाबालाल शेख तर उपाध्यक्षपदी विश्वास ईश्वरा चव्हाण यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सौ. कविता घाटगे होत्या. माजी अध्यक्ष आनंदा पाटील यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. अध्यक्षपदी महंमद शेख व उपाध्यक्षपदी विश्वास चव्हाण यांची वर्णी लागली. महंमद शेख हे माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच यात्रा कमिटी मध्ये पदाधिकारी व पांडुरंग विकास सेवा संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. विश्वास चव्हाण हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.

Advertisements

यावेळी बोलताना महंमद शेख म्हणाले, गावातील तंटा गावपातळीवरच मिटविण्यासाठी प्रयत्न करणार व गाव कसे गुण्यागोविंदाने नांदल याकडे प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निवडी प्रसंगी उपसरपंच प्रवीण कांबळे, तातोबा चव्हाण, बाबुराव धनगर, जयसिंग घाटगे, कुमार पाटील, समीर शेख, राजमहंमद शेख, बाळासो पाटील, तानाजी भोसले, भाऊसो नलवडे आदी उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!