मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार.
मुरगूड ( शशी दरेकर )

मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या आशीर्वादाने लोकसेवेचे व्रत जपू. “असा विश्वास मुरगुडच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सुहासिनी पाटील यांनी व्यक्त केला.
मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने मुरगूड नगरपरिषदेच्या नुतन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा,गटनेते, विरोधी पक्षनेते व नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य पी.डी. मगदूम होते.
नगराध्यक्ष पाटील म्हणाल्या. “मुरगुडच्या नागरिकांनी आमच्यावर विश्वासाने पालिकेची जबाबदारी सोपविली आहे. शासनाच्या विविध योजनांबरोबर मुरगुडचा सामाजिक एकोपा कायम राखण्यासाठी आम्ही कार्यरत राहू.ज्येष्ठ नागरिक संघातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन विकासाचे नवे पर्व यशस्वी करू.”
अध्यक्ष गंगापुरे म्हणाले, “स्व. लोकनेते सदाशिवराव मंडलिक व स्व. विश्वनाथराव पाटील यांनी मुरगुडच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थ भावनेने काम केले.तोच वारसा घेऊन नवनिर्वाचित नगरसेवकांनी कार्यरत राहावे. यावेळी त्यांनी जेष्ठ नागरिक संघाची स्थापना उद्देश संघापुढील समस्या व उपाय योजना मांडल्या.
शिवसेनेचे पालिकेतील गटनेते सुहास खराडे, ज्येष्ठ नगरसेवक शिवाजीराव चौगले, नगरसेवक सुनील रणवरे नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमात नगराध्यक्ष सौ पाटील यांच्यासह उपनगराध्यक्ष श्रीमती रेखाताई मांगले, गटनेते सुहास खराडे, विरोधी पक्षनेते बजरंग सोनुले, नगरसेवक शिवाजीराव चौगले, सत्यजित पाटील, रणजीत भारमल, सुनील मंडलिक, राहुल शिंदे, दीपक शिंदे, राजेंद्र कांबळे, नगरसेविका गीतांजली अंकुश श्रीमती निकेलिन बारदेस्कर, सुजाता पुजारी, वैशाली गोधडे, सुरेखा लोकरे यांचा सत्कार संघाचे पदाधिकारी शिवाजीराव सातवेकर, अशोक डवरी, पांडुरंग पाटील, सखाराम सावर्डेकर, विद्यागौरी हावळ, एम.टी.सामंत,रणजीत सासणे यांच्या हस्ते झाला.यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वागत जयवंत हावळ यांनी केले. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यांनी केले. निवेदन अविनाश चौगले यांनी केले.आभार संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर यांनी मानले.