राजयोग आणि मेडिटेशनने ताणतणावाचे व्यवस्थापन करा : राजश्री बहेनजी

कागल/ प्रतिनिधी
               आज सर्वांनाच ताण-तणावाला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक माणसाला मनशांतीची गरज आहे. मानवी कल्याण आणि शांतीसाठी दादी प्रकाशमणी  यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. प्रत्येकाने शांतीमय जीवनासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन करावे. यासाठी राजयोग आणि मेडिटेशनची गरज आहे. असे प्रतिपादन कागलच्या ब्रह्माकुमारी सेंटरच्या राजश्री बहेनजी यांनी केले.

Advertisements


        माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथी आणि विश्वबंधुत्व दिना निमित्त भारतभर रक्तदान अभियान राबवण्यात येत आहे. यानिमित्त कागलच्या ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Advertisements


कार्यक्रमाची सुरुवात दादी प्रकाशमणी यांच्या प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

Advertisements


राजश्री बहेनजी पुढे म्हणाल्या, देशभरातील सहा हजाराहून अधिक ब्रह्माकुमारी सेवा केंद्रामध्ये हे रक्तदान अभियान  राबविण्यात आले आहे. देशात एक लाख युनिट रक्त संकलनाचा संकल्प असून याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात येणार आहे. कागल, बानगे,सुळकुड येथील सेवा केंद्रामध्ये रक्तदान अभियान घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


      यावेळी कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वैभव जमादार यांनी सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये ब्रह्माकुमारीज सेंटर मधील ज्ञानाची आणि मेडिटेशनची गरज आहे. कागलच्या ब्रह्माकुमारीज केंद्रामध्ये आल्यानंतर शांतीची अनुभूती मिळाली.
       
यावेळी डॉ. झुंजारराव घाटगे, डॉ. अमोल चौगुले, सुनील यशवंत माळी, नितीन कांबळे, यांनी मनोगत व्यक्त केले.


स्वागत अनिता बहेनजी यांनी केले. सूत्रसंचालन प्रियंका बहेनजी योगिता बहेनजी यांनी केले. तर आभार सुभाषभाई यांनी मानले.


     कार्यक्रमास डॉ. धनंजय पाटील, डॉ. सुनिता चौगुले, डॉ. वृषाली तोरगलकर, सागर माळी, प्रकाश माळी, बापू फराकटे, स्नेहल बहेन, दीपा बहेन, संध्या बहेन, कविता बहेन, संगीता बहेन, यांच्यासह ब्रह्माकुमारी सेवा केंद्राचे साधक उपस्थित होते.


कागल ब्रह्मकुमारी सेवा केंद्रा मध्ये रक्तदान शिबिर कार्यक्रमात बोलताना राजश्री बहेन व इतर

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!