सिद्धनेर्ली (प्रतिनिधी) : UPSC केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेणेत आलेल्या परीक्षेत स्वप्नील तुकाराम माने याचा देशात 578 रँक आल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघांच्या वतीने माने याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघांचे अध्यक्ष राजाराम वरूटे, कोल्हापूर ज़िल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे, संचालक प्रशांत पोतदार, मारुती दिंडे, कुमार सिध्दनेर्ली शाळेचे मुख्याध्यापक गणपती धनगर (पुजारी) आदी प्रमुख उपस्थित होते. स्वप्नील माने यांचा सत्कार राजाराम वरूटे यांच्या हस्ते करणेत आला.