कोल्हापूर ( प्रा.सुरेश डोणे ) : संपूर्ण आयुष्य ब्रह्मचारी राहून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यात करणारे मौजे सांगावं (ता.कागल)येथील ह.भ.प महादेव गणू पाटील यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी आज वृद्धापकाळाने निधन झाले.
पाटील महाराज यांना लहानपणापासून भजनाची आवड होती.देहूकर फडाचे निष्ठावंत महिन्याचे वारकरी असून ते निश्चिम विठ्ठल भक्त होते.अनेक गावांमध्ये त्यांनी भागवत धर्माची सुरवात करून अनिष्ट प्रथा बंद केली.
आज त्यांच्या निधनाची बातमी कळताच वारकरी संप्रदाय,राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावली.टाळ-मृदंग व नामघोषाने गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.शेवटी शासकीय इतमात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले.