![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2022/11/IMG-20221101-WA0035.jpg)
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांचा पलटवार
कागल दि: 1 : समरजीत घाटगे यांच्या समर्थकांकडूनच निराधार योजनेतील वृद्ध लाभार्थ्यांची आर्थिक लूट केली जात होती असा पलटवार केडीसीसी बँकेची संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केला आहे.
कागलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. माने यांनी हा आरोप केला. यावेळी बोलताना श्री माने म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाने व मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच कार्यकर्ते अहोरात्रपणे गोरगरिबांची सेवानिर्पेक्ष भावनेने करीत आहोत. असे असताना राजकीय द्वेषापोटी आमच्या कार्यकर्त्यांवर पैसे घेतल्याचे निराधार आरोप केले जात आहे हे खपवून घेतले जाणार नाही.
निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची पेन्शन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या केंद्र कार्यालय आणि सर्व शाखांसह राष्ट्रीयकृत बँकांमधूनही डीबीटीद्वारे जमा होते. या उलट अडीच वर्षांपूर्वी ही पेन्शन ज्यावेळी कागल को-ऑपरेटिव्ह बँकेत जमा होत होती.
त्यावेळी समरजीत घाडगे यांच्या समर्थकांकडून निराधारांची आर्थिक लूट केली जात होती हे वास्तव आहे.
“गरिबांच्या चुलीत पाणी……”
श्री माने म्हणाले, निराधार योजनेचे लाभार्थी आमदार मुश्रीफसाहेब यांची वोट बँक आहे असा विरोधकांचा समज आहे. त्या द्वेषातुन त्यांनी नाहक तक्रारी करून हजारो पेन्शन रद्द केल्या आहेत आताही असे आरोप प्रत्यारोप करून गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, कागल शहराध्यक्ष संजय चितारी, नारायण पाटील, प्रवीण काळबर, दत्ता पाटील, के. पी. पिष्टे, सुनील माने, सुनील माळी, प्रवीण सोनुले आदी प्रमुख उपस्थित होते.