मुरगूड ( शशी दरेकर ) : कन्या विद्या मंदिर मुरगुड या जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानाबरोबर कला, क्रिडा व संस्कारक्षम शिक्षण मोफत दिले जाते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेवू द्या व त्यांच्या कलागुणानं वाव द्या असे स्पष्ट मत मुरगुड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांनी व्यक्त केले.ते कन्या विद्या मंदिर मुरगुड येथे वार्षिक स्नेहसंमेलन समारंभात शालेय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर सापळे होते.
या वेळी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक झालेल्या माजी विद्यार्थीनींचा व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी खामकर यांनी केले. या नंतर मुलींच्या विविध कलागुण दर्शविणारा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात मुलींच्यामध्ये पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त असणाऱ्या अनेक कलागुणांना दर्शन उपस्थितांना झाले.खासगी शाळांच फॅड समाजात फोफावत असताना, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्या मुली सुद्धा मुलांच्या बरोबरीने चमकू शकतात असा विश्वास पालकांकडून होणार्या टाळ्यांच्या प्रतिसादामुळे निर्माण होत असल्याचे पालकांवर्गातुनच जाणवत होते. यासाठी श्रीमती सारीका रामसे व श्रीमती भारती साळोखे यानी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी रुक्साना ताशिलदार, शैलजा कांबळे, जयश्री पाटील, माधुरी भुते, संदीप बरकाळे, रणजीत पोवार, शाळा व्यवस्थापनचे सदस्य उपस्थित होते. विवेकानंद क्लासेसचे संचालक निलेश सावंत, अमर कांबळे, सुरेखा रामसे, माळवदे मॅडम, दमयंती गिरी मॅडम, माजी मुख्याध्यापक अनंत पाटील व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.