बाचणी (प्रतिनिधी) – बाचणी ता. कागल येथे सुरू असलेल्या शालेय राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेत मुलांमध्ये लातूरच्या संघाने तर मुलींमध्ये पुण्याच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. येथील साई दिशा अकॅडमी बाचणी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मुलींचा अंतिम सामना पुणे आणि नाशिक या विभागांमध्ये झाला यामध्ये पुणे संघाने अजिंक्यपद पटकावताना 25-14, 25-9, 25-14 अशा सर्व सेटमध्ये नाशिक संघाचा पराभव केला आणि अजिंक्यपद पटकावले पुण्याकडून रक्षा खेळणार ऋतुजा कुंभार या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर नाशिकच्या हिमांशू ओतारी या खेळाडूने एकाकी झुंज दिली.
मुलांचा सामना कोल्हापूर विरुद्ध लातूर यांच्यामध्ये झाला हा अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला सुरुवातीला कोल्हापूरच्या संघाने 25-22 फरकाने पहिला सेट जिंकला दुसरा सेट 21-25 फरकाने लातूरने जिंकला तिसरा सेट 18-25 फरकाने लातूरने जिंकला चौथा सेट 25-21 फरकाने कोल्हापूरने जिंकला त्यामुळे शेवटच्या सेटमध्ये 15 गुणांची आवश्यकता असताना, अतिशय रोमहर्षक खेळ करीत लातूर संघाने मुलांमधले अजिंक्यपद कोल्हापूर कडून संकेत पाटील खेळाडूची झुंज व्यर्थ ठरली तर लातूर कडून निर्भय देशमुख आणि प्रथमेश गंगाने यांनी उत्कृष्ट खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.पंच म्हणून सागर आवळे स्वागत गवळी इब्राहिम शेख सौरभ भातमारे यांनी काम पहिले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना घाटगे म्हणाले,खेळात फिटनेस खूप महत्वाचा आहे .तुम्ही मुलांनी आई वडिलांची कृतज्ञता व्यक्त करा कारण तुमच्या खेळासाठी वेळ आणि पैसे खर्च करतात .आमच्या काळात असे नव्हते पण आज काळ बदलला आहे. अजित पाटीलांसारखे कोच तुम्हाला मिळाले हे भाग्य समजा. खेळामुळे मुले व्यसनापासून बाजूला राहतात.
स्वागत व प्रास्ताविक दिशा अकॅडमीचे संस्थापक अजित पाटील यांनी केले. यावेळी प्रकाश पाटील कराड, दादा देशमुख, निवास पाटील, दिनकर जाधव, शिवाजी अजित पाटील, नरेंद्र पाटील, प्राचार्या सौ अरुणा पाटील,रायगडचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर ,कोल्हापूरचे चंद्रशेखर साखरे आदी प्रमुख उपस्थित होते. आभार शिवाजी डकरे यांनी मानले.