“किरण गवाणकर” यशस्वी उद्योजक, गोर- गरीबासाठी झटणारे व्यक्तिमत्व – शिवाजीराव चौगले

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड बाजारपेठ येथिल किरण गवाणकर हे यशस्वी उद्योजक  व गोरगरीबासाठी कळवळा असणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांनी कठीण परस्थितीतून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगली प्रगती केली आहे. त्यांचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे.

Advertisements

त्यांच्या नगर परिषदेच्या नगरसेवक कार्य- किर्दीत अनेक विकासकामे केली आहेत असे गौरवउद्गार नूतन नगरसेवक शिवाजीराव चौगले यानीं काढले. ते मुरगूड येथिल किरण गवाणकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या ६६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बोलत होते. या प्रसंगी प्रसंगी त्यांचा शाल, श्रीफळ, गुच्छ देऊन  यथोचित सत्कार करण्यात आला.

Advertisements

या कार्यक्रम प्रसंगी नगरपरिपदेचे माजी उपनगराध्यक्ष जयशिंगराव भोसले, माजी नगरसेवक दिपक शिंदे, सुधिर गुजर, सेवानिवृत्त पोलिस निवास कदम, गहिनिनाथ समाचारचे प्रतिनिधी शशी दरेकर. कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक संस्थेचे संचालक महादेवराव साळोखे, बाजीराव खराडे, उद्योगपती चंद्रकांत दरेकर यांच्यासह नागरीक मित्रपरिवार त्यानां शुभेच्छा देण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!