कागल /प्रतिनिधी – अखिल भारत हिंदू महासभेच्या कागल तालुका अध्यक्षपदी राजेंद्र दिनकराव साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सदस्य मनोहर सोरप यांनी निवडीचे पत्र नुकतेच साळुंखे यांना दिले आहे.
Advertisements
श्री साळुंखे यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी नियुक्ती केली होती .हिंदू चळवळीचा ते सच्चा कार्यकर्ता आहेत. हिंदू संघटनांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला आहे. अलीकडेच त्यांनी हिंदू महासभेमध्ये प्रवेश केला. हिंदू महासभेचे कार्य जोमाने करण्याचा त्यांचा मानस आहे. भविष्यात भारतीय हिंदू महासभेचा आमदार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Advertisements

AD1