कागल/प्रतिनिधी : कसबा सांगाव तालुका कागल येथील वाकी धरणग्रस्त वसाहतीमध्ये बंद घरातून रोख रक्कम यासह सोन्या चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्याने पोबारा केला होता. सुमारे १० लाख ७३ हजार ६९५ रुपयांची चोरी झाली होती.या चोरीचा छडा लावण्यात कागल पोलिसांना यश आले आहे.

Advertisements

आरोपी राजासाहेब गुलाब नायकवडी, वय वर्ष- 43 ,राहणार -सोलापूर ,तालुका -हुक्केरी, जिल्हा -बेळगाव (कर्नाटक राज्य )याला जेरबंद केले आहे. चोरीस गेलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यातील रुपये ७ लाख ८८ हजार ३७५ रुपयाचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

Advertisements

                    गुरुनाथ बाळू पाटील 26 राहणार -वाकी धरणग्रस्त वसाहत ,कसबा सांगाव हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. तारीख 20 मे 2025 रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान आरोपी राजासाहेब नाईकवडी याने बंद घराचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला घरातील सोन्या चांदीचे किमती अलंकार व रोख रक्कम असा १० लाख ७३ हजार ६९५ किमतीचा माल चोरून त्याने पोबारा केला होता.

Advertisements

          तारीख 21 मे रोजी कागल पोलीस ठाण्यात गुरुनाथ पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून कागल पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत आरोपीपर्यंत माग काढण्यात यश आले. आणि कागल पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपी राजासाहेब नाईकवडी हा सराईत गुन्हेगार आहे  गडहिंग्लज ,निप्पाणी, संकेश्वर व हुपरी या चार पोलीस ठाण्यात त्याच्यावर चोरीचे 18 गुन्हे दाखल आहेत.

              कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार, करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर ,कागल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार, सहायक फौजदार बिराप्पा कोचरगी, सहाय्यक फौजदार प्रशांत माने, हवालदार संभाजी जाधव ,विजय पाटील, मुनाफ मुल्ला, अंमलदार प्रभाकर पुजारी ,बिरू रानगे ,युवराज पाटील ,जाफर कुरणे ,सरदार पाटील, शंकर काशीद ,यांनी आरोपीला जेलची हवा दाखविली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे करीत आहेत.

AD1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!