व्हनाळी : कागल पोलिस स्टेशन चे नुतन पोलीस निरीक्षक म्हणून गंगाधर घावटे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे त्याबद्दल त्यांचा कागल तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदाधिकारी, शिवसैनिकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी संभाजी भोकरे, शिवगोंडा पाटील, अशोक पाटील (बेलवळेकर) यांच्या हस्ते नुतन पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे यांचा सत्कार करण्यात आला.

पोलिस निरिक्षक श्री घावटे म्हणाले, सामाजिक बांधिलकीतून सर्वच पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळी यांनी समाजात कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी पोलिसांना नेहमीच सहकार्य करावे. पोलिस आणि नागरिक यांच्या समनवयातून संवाद, भेटीगाठी वाढविल्यास पोलिस आणि सामान्य नागरिक यांच्यातील आपुलकीचा सलोखा वाढेल यातून समाजात चांगले परिवर्तन होण्यास मदत होईल असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी उपनिरीक्षक जमादार, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख शिवगोंड पाटील, तालुका प्रमुख अशोक पाटील (बेलवळेकर), दिलीप पाटील, शहर प्रमुख अजित मोडेकर, शहर संघटिका दिपाली घोरपडे, विभागप्रमुख वैभव आडके, अमर शिंदे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थीत होते.