केनवडे येथे कागल तालुका पत्रकार संघामार्फत पत्रकारदिन उत्साहात
व्हनाळी (सागर लोहार): पत्रकारिता हा समाज मानाचा आरसा असून त्यात सत्याचे प्रतिबिंब पहावे. पत्रकारिते मुळे अनेक सामाजिक प्रश्नांची उकल होत असून उपेक्षितांना न्याय देन्याची बांधीलकी नेहमीच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार बांधव करत असल्याचे प्रतिपादन गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी केले.
केनवडे फाटा ता.कागल येथे बाळशास्त्री जांभेकर कागल तालुका पत्रकार संघामार्फत आयोजित पत्रकार दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतशांतीचे संस्थापक भगवान गुरव होते. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन अंबरिषसिंह घाटगे,ज्येष्ठ पत्रकार एन.एस.पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माझा गाव न्यूज चॅनेलच्या वेब पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. तसेच आदर्श पत्रकार पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. यावेळी रमेश पाटील,एकनाथ पाटील,प्रकाश कारंडे,तालुका अध्यक्ष सागर लोहार,डी.एच.पाटील,सुभाष चौगले यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमास राजेंद्र काशीद,दिपक कांबळे,विकास सरावणे,सुभाष चोगले,जे.के.गोरंबेकर,रसूल शेख,समिर मकानदार,प्रकाश पाटील उपस्थीत होते. स्वागत मॅनेंजर तानाजी कांबळे यांनी केले आभार बाजीराव पाटील यांनी मानले.