मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वतः च्या वैयक्तिक जीवनातील सुख दु:ख बाजूला सारून पत्रकार मित्र सामाजिकतेच्या भावनेतून लोकांच्या भावना प्रशासना पर्यंत पोहचवतात . पत्रकारिता ही समाजाचा आरसा आहे . समाजातील चांगल्या वाईट घटनांचे प्रतिबिंब वृतपत्रकातून समाजासमोर येते. असे प्रतिपादन मुरगूडचे सपोनि दिपक भांडवलकर यांनी केले.
ते मुरगूड शहर पत्रकार फाऊंडेशनच्या वतिने आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस तथा पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती .
सपोनि दीपक भांडवलकर व एसटी महामंडळ जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शहर पत्रकार फाउंडेशनचे माजी अध्यक्ष श्याम पाटील यांना जिल्हा वेलफेअर पत्रकार असोसिएशन चा जिल्हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा फाउंडेशनच्या वतीने शाल , श्रीफळ , बुके देऊन सत्कार करण्यात आला . तसेच मुरगूडचे सुपुत्र अभिजीत भोसले यांची एस टी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही शाल , श्रीफळ , बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष प्रकाश तिराळे,अनिल पाटील, अविनाश चौगले , दिलीप निकम ,भैरवनाथ डवरी, समीर कटके, संदिप सुर्यवंशी , जोतीराम कुंभार , शशिकांत दरेकर या पत्रकार बांधवांसह कॉ बबन बारदेस्कर , विनायक रनवरे, धोंडीराम परीट, सर्जेराव भाट, अरुण मेंडके आदी उपस्थित होते .
या कार्यक्रमचे स्वागत प्रविण सुर्यवंशी यांनी तर प्रास्ताविक प्रा.सुनिल डेळेकर यांनी केले . सुत्रसंचालन प्रा. रविंद्र शिंदे यांनी तर आभार राजू चव्हाण यांनी मानले .
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.