मुरगूड ( शशी दरेकर ) : मा. जिल्हाधिकारी,कोल्हापूर श्री.अमोल येडगे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, तालुका आरोग्य अधिकारी, कागल डॉ.फारूक देसाई यांनी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत  “निक्षय मित्र” होऊन  क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी सहाय्य करणेबाबत आवाहन केले आहे, या आवाहनास प्रतिसाद म्हणून मुरगूड येथिल श्री. जोतीराम गोपाळराव सूर्यवंशी यांनी संमती दिलेल्या १०  क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार  कीटचे सहाय्य केले.

Advertisements

यावेळी “निक्षय मित्र” यांचा सत्कार वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या पोषण किटचे वाटप ग्रामीण रुग्णालय मुरगुड येथे करण्यात आले.

Advertisements

यावेळ वैद्यकीय अधीक्षक मुरगूड  ग्रामीण रुग्णालय डॉ. अमोल पाटील बोलताना म्हणाले  की क्षयरोगाच्या उपचार कालावधीत औषधांबरोबरच योग्य पोषण आहार मिळाल्यामुळे  रुग्ण औषधे मध्येच सोडत नाही व  नियमित विनाखंड औषधोपचार  घेतो. यामुळे रुग्ण वेळेत पूर्ण बरा होतो व रूग्णास पुढील टप्प्यातील क्षयरोग होत नाही. यासाठी क्षयरुग्णांना जास्तीत जास्त सकस आहार घेण्याची  आवश्यकता आहे.

Advertisements

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील  यांनी मुरगूड मधील २ तर आजरा येथील २ टीबी पेशट दत्तक घेतल्याबद्दल त्याचे सर्व  अधिकारी कर्मचारी यांनी आभार मानले.आरोग्य निरीक्षक श्री .विजय कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले ,श्री.एकनाथ पाटील यांनी निक्षयमित्र बाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.पूनम कुंभार यांनी केले व आभार समुपदेशक श्री.राजेश गोधडे यांनी मानले.

या  कार्यक्रमावेळी बहिर्जी पेट्रोलियम मुरगूड ,गडहिंग्लज व गोपाल एजन्सीज मुधाळ तिट्टा चे मालक मा. श्री.जोतीराम सूर्यवंशी पाटील(तात्या),सरपंच भडगाव मा.श्री.बी.एम.पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी घुमरे, दंत  चिकित्सक, डॉ.सचिन जिरगे, श्री.विनायक साठे,श्री.अरुण कांबळे, श्री.गणपती पुजारी, श्रीम.स्वप्नाली परीट, श्री.राजेंद्र कुंभार, श्री.राजेश गोधडे, श्री बाजीराव पाटील,श्रीम.सुरेखा कांबळे, टीबी सुपरवाझर श्रीम.गौरी खैरमोडे ,श्रीम .रुपाली सासणे श्री. विजय प्रधान, श्री.ओकार जाधव व ग्रामीण रुग्णालय  मुरगूड मधील सर्व अधिकारी,आरोग्य कर्मचारी स्टाफ उपस्थित होता.

By G1 G2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!