कागल (प्रतिनिधी) : खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेस जोडेमारो व निषेध आंदोलन करण्यात आले. कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस व महिला राष्ट्रवादी काॕग्रेस यांच्या मार्फत गैबी चौक, कागल येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन व निषेध करण्यात आला, तसेच चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने, गोकुळ दुध संघाचे संचालक नविद मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, श्रीनाथ समुहाचे अध्यक्ष चंद्रकांत गवळी, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काॕग्रेस संजय चितारी, सतिश घाडगे, सागर गुरव, पंकज खलिफ, इरफान मुजावर, शशिकांत नाईक, सुनिल माळी, अस्लम मुजावर, संजय ठाणेकर, अमर सणगर, माजी नगराध्यक्ष संगिता गाडेकर,आशाकाकी जगदाळे, शहनाज आत्तार, माधवी मोरबाळे, सुषमा पाटील व राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते