मुरगूड ( शशी दरेकर ) : मानवी जीवन निरोगी व सुदृढ राहण्यासाठी योगाचे आचरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. गजानन गंगापुरे यानी केले.
ते जागतीक योग दिनानिमित्य मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केद्रात बोलत होते. ते पुढे म्हणाले आपल्या देशाच्या यशस्वी प्रयत्नामुळेच संपूर्ण जगात २०१५पासून योग दिन साजरा होत असल्याचे त्यानी स्पष्ट केले.
यावेळी योग मार्गदर्शक श्री. जयवंत हावळ यानी मानव शरीर स्वस्थ व निरोगी राहण्याठी सर्वानीं नियमीत योगासने करण्याची गरज आहे असे सांगून मान, पाठ, कंबर, सांधे, हात – पाय, डोळे, चेहरा इ . सर्वांग स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी करावयाचे योग प्रकार प्रात्यक्षिकांद्वारे समाजावून सांगून सर्वांच्याकडून करवून घेतला. दुसरे योग मार्गदर्शक श्री. रंगराव चौगले यानीं आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
१६ ते २१ रोजी झालेलया या योग शिबिरास उस्पूर्तपणे प्रतिसाद मिळाला . लोकमंगल मल्टी स्टेट कोऑप सोसायटी शाखा मुरगूडचे कर्मचारी श्री .आकाश कांबळे व सुनिल खराडे यानी योगदीन कार्यक्रमात सहभाग घेऊन जेष्ठानां योग विषयक मार्गदर्शन केले .व-संस्थेच्या कार्याबाबत माहिती दिली . उपस्थित सर्व शिबिरार्थिनां चहा – नाष्टा संस्थेमार्फत देऊन विशेष सहकार्य केले.
या योग शिबीर प्रसंगी योग शिबिर उत्कृष्ट घेतल्याबद्दल जयवंत
हावळ यांचा जेष्ठ नागरीक संघ व लोकमंगल मल्टी स्टेट कोऑप सोसायटी यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. वेळोवेळी अशी शिबिरे घेण्यात यावीत अशी मनोगते यावेळी अनेकानी व्यक्त केली. शेवटी संचालक श्री. एम. टी. सामंत यानी उपस्थितांचे आभार मानले.