मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथिल -सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांना पुणे येथे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य डॉ. एस. एन. पठाण यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलन्स अॅवॉर्ड २०२३ गौरवपूर्ण समारंभात प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे याचे स्वरूप आहे.
यापूर्वी त्यांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार, उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, सामाजिक व शैक्षणिक पुरस्कार, युवा पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केलेला आहे.
सदरच्या कार्यासाठी त्यांना जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी खासदार प्रा. संजय मंडलिक, कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक कार्यवाह अण्णासाहेब थोरवत, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार ,प्रा. संभाजी अंगज यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. उदय शिंदे व गोरख साठे यांचे सहकार्य लाभले. प्रा.डॉ.पाटील यांचे अनेक शैक्षणिक, सामाजिक व सहकारी संस्थांशी निकटचे संबंध आहेत. अॅवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.