सिद्धनेर्ली (लक्ष्मण पाटील):- येथील शाहू ग्रुपअंतर्गत स्व.एस.के.मगदूम सहकार समूहमधील संस्थांनी दूध बोनस, फरक, लाभांश, कर्मचारी बोनस रूपात ७० लाख रुपयांचे वाटप केले. विविध संस्थांच्या ३२ कर्मचाऱ्यांना ४३ टक्के इतका उच्चांकी बोनस सुद्धा वाटप केला. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांच्या हस्ते त्याचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत जयसिंगराव घाटगे पतसंस्थेचे संचालक आनंदा घराळ होते. शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष स्व.एस के मगदूम यांनी या सर्व संस्था स्थापन केल्या आहेत. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा सुनील मगदूम यांचे नेतृत्वाखाली या सर्व संस्था कार्यरत आहेत. यावेळी सौ, घाटगे म्हणाल्या, ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो व तो आधारही ठरत आहे.विशेषतः कोरोना व नैसर्गिक संकटांच्या काळामध्ये अशा संस्थांमधून मिळणारा बोनस फरक व डिव्हिडंड यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होत आहे. यावेळी महालक्ष्मी शाहू व दुधगंगा दूध संस्था उत्पादकांना दूध बोनस फरक वाटप केले. श्रीमंत जयसिंगराव घाटगे गेव पतसंस्था व इतर संस्था मधील सभासदांना लाभांश वाटप केले.
कार्यक्रमास बळीराम मगदूम, बा.ना.घराळ, सोपान घराळ, रमेश कांबळे, युवराज पाटील, सुनील निकम, संभाजी पाटील, शिवाजी मगदूम, बाळू कांबळे, दिनकर साठे आदी उपस्थित होते. स्वागत उज्ज्वला पोवार यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सुनील मगदूम यांनी केले, आभार श्रीमती लक्ष्मीदेवी गोनुगडे यांनी मानले.