कागल, : प्रतिनिधी
सहकार ही धनदांडग्यांची चळवळ नसून सामान्य माणसाची चळवळ आहे ती टिकायला हवी. खूप वर्षाच्या प्रयत्नानंतर या संस्थेचे हे शिखर तयार झाले आहे. सर पिराजीराव पतपेढीची यापुढेही अधिक भरभराटीला व्हावी. असे प्रतिपादन माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी केले .
येथील सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीषसिंह घाटगे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर, जिल्हा परिषद कर्मचारी सह. सोसायटी, कोल्हापूरचे अध्यक्ष सुनिल पाटील, गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे, धनराज घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अंबरीषसिंह घाटगे म्हणाले, अभिमान वाटावा असे काम या संस्थेने व संचालकांनी केले आहे. शिक्षक ही आपली अस्मिता आहे त्यांना स्वास्थ्य लाभणे गरजेचे आहे, त्यांच्यासाठी करता येईल तेवढे काम करत राहणं गरजेचं आहे. कागल तालुक्यातील शिक्षकांनी आपली एकजूट अबाधित ठेवली आहे हे कौतुकास्पद आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन संस्था प्रगतीपथावर नेत आहात हे अभिमानास्पद आहे. यासाठी सभासदांचा खूप मोठा विश्वास असावा लागतो आणि तो विश्वास तुम्ही जिंकलेला आहात. इंजिनिअर चंदर वाडकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
बाळासाहेब निंबाळकर, सुनिल पाटील, गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष प्रदीप बुधाळे-पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. आभार उपाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमास सुकानु समिती सदस्य के.डी.पाटील,एकनाथ बागणे ,अरविंद शिंदे, अवेलिन देसा,प्रकाश चौगुले,मोहन पाटील,प्रकाश मगदूम,संजय दाभाडे,कृष्णात बागडी.संस्थेचे संचालक नेताजी कमळकर, पांडुरंग पाटील, बाळासो तांबेकर, किशोर जाधव, बाळू खामकर, जितेंद्र कुंभार, तुकाराम इंगवले, रमेश कदम, हरिश्चंद्र साळोखे, आनंदा कांबळे,अनिल डवरी, सौ.रोहिणी लोकरे, सौ. वैशाली भारमल, मल्हारी पाटील, तज्ञ संचालक राजाराम सावर्डेकर तसेच व्यवस्थापक संताजी पाटील व कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करताना माजी आमदार संजय बाबा घाटगे, अंबरीषसिंह घाटगे, बाळासाहेब निंबाळकर, सुनिल पाटील, सौ. सारिका कासोटे, धनराज घाटगे आदी मान्यवर…