मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील सानिका FC स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने मुरगूडमध्ये प्रकाशझोतात आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात येथील सानिका स्पोर्ट्सने तुकाराम चौक बारामती संघाचा सात धावांनी पराभव करीत रोख ७५,६९९च्या रोख बक्षीसासह प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला.
प्रथम क्रमांकासाठी सानिका स्पोर्टस् मुरगूड व तुकाराम चौक बारामती यांच्यात चुरशीचा सामना झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सानिकाने प्रवीण मांगोरे याच्या चार षटकार व एक चौकाराने केवळ तीन षटकात बिनबाद ४५ धावा केल्या. मात्र उर्वरित तीन षटकात बारामती संघांने केवळ ११ धावा देत सानिकाला ५६ धावावर रोखले. या धावांचा पाठलाग करताना बारामती संघाचे फलंदाज प्रत्येक षटकात बाद होत गेल्याने तळातील फलंदाजावर दबाव आला. तरीही निकराची झुंज देत सामना २ चेंडूत ८ धावा अशा स्थितीत आणला.
मात्र सानिका कडून अचुक गोलंदाजी झाल्याने बारामती संघास सात धावांनी पराभवास सामोरे जावे लागले. तत्पूर्वी अंतिम फेरीत धडक देताना सानिका स्पोर्टस् मुरगूड संघाने मयूर स्पोर्टस् लिंगनुर संघाचा पराभव केला. या सामन्यात सानिकाचा साहिल मोमीन मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला . तर तुकाराम चौक बारामती संघाने मयूर स्पोर्टस् निपाणी संघास पराभूत करून अंतिम फेरी गाठली . या सामन्यात तुकाराम चौक बारामती संघाच्या सौरभ मांजरे मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला.
वैयक्तिक बक्षीसे
स्पर्धेतील वैयक्तिक बक्षीसे अशी – मॅन ऑफ द सिरीज – साहिल मोमीन (सानिका स्पोर्टस् मुरगूड), अंतिम सामना मॅन ऑफ द मॅच – प्रवीण मांगोरे (सानिका स्पोर्टस् मुरगूड) ,बेस्ट बॉलर – संतोष कसवतकर (सानिका स्पोर्टस् मुरगूड)
बेस्ट बॅटमॅन – सौरभ मांजरे (तुकाराम चौक बारामती) बेस्ट फिल्डर – अक्षय तावरे (तुकाराम चौक बारामती)
सानिका स्पोर्टस् फौंडेशन च्या वतिने आयोजित या क्रिकेट महासंग्रामचे उद्घाटन विरेंद्र मंडलिक यांचे हस्ते तर बक्षिस वितरण शाहूग्रुपचे अध्यक्ष समजित राजे घाटगे यांचे हस्ते पार पडले पाच दिवस चाललेल्या या प्रकाश झोतातील क्रिकेट महासंग्रामास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी आम. संजय घाटगे, गोकूळ संचालक अंबरिश घाटगे, केडीसी संचालक अर्जुन आबिटकर, बिद्री साखरचे संचालक प्रवीणसिंह पाटील,माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.
बक्षीस वितरण समारंभास भाजपा जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक, गोकूळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सानिकाचे संस्थापक अध्यक्ष दगडू शेणवी व सानिकाच्या सभासदांनी अथक परिश्रम घेतले. स्वागत सुशांत मांगोरे, प्रास्ताविक दगडू शेणवी यांनी केले .सुत्रसंचालन व समालोचन अमर कांबळे, अनिल पाटील, ( सर ) यांनी केले तर स्कोरर म्हणुन बाळू मणेर, सुनील गायकवाड,तर पंच महेश पुरिबुवा,विकी बोरगावे, रमेश वांइगडे, संजय वारके यांनी काम पाहिले स्पर्धा पार पडण्यासाठी पांडुरंग कुडवे,सागर सापळे,निवास कदम, जगदिश चितळे,रामा नरके, रतन जगताप आदींचे सहकार्य लाभले, तर आभार नंदकिशोर खराडे यांनी मानले.