मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल बाजारपेठ शिवप्रेमीतर्फे लोकनेते स्व . सदाशिवराव मंडलिक यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रथम स्व. मंडलिक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन श्री. मधूकर मंडलिक ( गुरुजी ) यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळून लोकनेते मंडलिक साहेबानां श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शिवभक्त धोंडीराम परीट ( जय महाराष्ट्र ) यानीं मंडलीक साहेबांच्या आठवणीनां उजाळा दिला . ते म्हणाले सत्य आणि पावित्र्य त्यानीं राजकारणात जपल्याने सामान्य जनतेचा विश्वास संपादन केला होता .जनतेच्या पाठबळावर कार्यकर्त्याची मजबूत फळी निर्माण केली होती . साहेब गोरगरिबाच्या कामासाठी कायमपणे झटत राहिले .जनता हे त्यांचे ऋण कदापी विसरणार नाही.
यावेळी सनी गवाणकर , पिंटू रणवरे, शिवाजी चित्रकार, आशिष मोर्चे, बाजीराव नलगे, शशी दरेकर, पी .एल् . कांबळे, औकार दरेकर, आदि उपस्थित होते.