मुरगूड नागरिक व नगरसेवकांच्या वतीने अजित दादाना भावपुर्ण श्रद्धांजली. मुरगूड शहर पत्रकार संघातही अजितदादाना श्रद्धांजली अर्पण

मुरगूड ( शशी दरेकर )

     महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले.

    मुरगूड येथील नागरिक व नगरसेवकांच्या वतीने नगर परिषदेसमोरील शिवतीर्थ येथे भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली.

    शहरातील जेष्ठ नागरिक अनंत फर्नांडीस,  वि. रा. भोसले  माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर  यांचे हस्ते दादांच्या प्रतिमेस फुले वाहून हार घालण्यात आला. नगराध्यक्षा सौ. सुहासिनी देवी पाटील यांच्या मार्फत त्यांचे चिरंजीव दिग्विजय पाटील यांनी हार अर्पण केला व संवेदना मांडल्या.

   ओंकार पोतदार यांनी शोक सभेचे प्रास्ताविक केल्या नंतर तीन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अजितदादा यांच्या राजकीय व सामाजिक कार्याबद्दल अनेकांनी मनोगते व्यक्त केली. नगरसेवक सुहास खराडे, एस व्ही चौगुले, माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, प्रा. चंद्रकांत जाधव, दिगंबर परीट, बबन बारदेसकर, रणजित सुर्यवंशी, यांनी मनोगते मांडली.

    या वेळी नगरसेवक सुनील रणवरे, राजू आमते,सत्यजित पाटील, रणजित भारमल, राहुल शिंदे यांच्यासह  अमर चौगुले, साताप्पा खंडागळे, बजरंग सोनुले, नामदेव भांदीगरे शिवाजी मोरबाळे, अमर देवळे, दीपक शिंदे डॉ. सुनील चौगुले,इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. अमर रहे, अमर रहे अजितदादा अमर रहेच्या घोषणा यावेळी जनसमुदायानीं दिल्या.

      त्याचबरोबर मुरगूड शहर पत्रकार संघातही अजितदादानां श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. पत्रकार संघाचेअध्यक्ष महादेव कानकेकर, वि .रा. भोसले, अविनाश चौगले यानीं अजितदादांच्या राजकीय आठवणी सांगत त्यानां श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी उपाध्यक्ष जे.के. कुंभार, सचिव संदिप सुर्यवंशी, पत्रकार रविंद्र शिदे, अनिल पाटील,  सुनिल डेळेकर, दिलीप निकम, श्याम पाटील, समीर कटके, प्रकाश तिराळे, भैरवनाथ डवरी,  प्रविण सुर्यवंशी, शशी दरेकर, ओंकार पोतदार, विजय मोरबाळे, सर्जेराव भाट उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!