शहीद महाविद्यालय – पंत वालावलकर हॉस्पीटल – सोंळाकूर प्राथमिक केंद्राचा चा सहभाग
गारगोटी (प्रतिनिधी) – येथे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे आणि पंत वालावलकर हॉस्पिटल, कोल्हापूर व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉडी मास इंडेक्स (बी एम आय) ,रक्तगट, सामान्य चिकित्सा आणि डोळे तपासणीचे शिबीर झाले. गणेश जयंती निमित्त तुरंबे गणेश मंदिर येथे आलेल्या भाविकांनी उत्स्फुर्तपणे या शिबिरास प्रतिसाद दिला. जवळपास दोनशेहून अधिक भाविकांची याप्रसंगी आरोग्य तपासणी करण्यात आली.
वालावलकर हॉस्पिटलच्या डॉ. वीरेंद्र वनकुंद्रे, पूजा यमगर ,डॉ. दीपक केसरकर ,विजय पाटील, कविता कांबळे प्रा. निवेदिता गुरव, प्रा. अमिता पाटील व विद्यार्थिनींनी तसेच सोळांकूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य एम पी डब्ल्यू आदी सहभागी झाले होते.सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ पोवार यांच्या सहकार्यातून हे शिबीर पार पडले. राजेंद्र मकोटे यांनी संपूर्ण शिबिराचे समन्वयक म्हणून जबाबदारी पहिली.
यावेळी अरविंद पलंगे , सुभाष राऊत ,रघुनाथ बानगुडे,मनीषा रोटे, मारुती दौलत्कार गुरुजी ,राजेंद्र चौगुले उदय किल्लेदार ,मनोज कोटकर समुपदेशक विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते, सिद्धिविनायक ट्रस्ट तुरंबेचे पदाधिकारी बीएस्सी मायक्रो. , डी.एम.एल.टी., फूड सायन्स अँड न्युट्रिशनच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. गणेश भक्तां सह पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला .