श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर ची विद्यार्थिनी हर्षदा आनंदा खापणे हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दुहेरी यश प्राप्त केले. जय हनुमान हायस्कूल इस्पुर्ली येथे प्रथम क्रमांक तर वि. स. खांडेकर प्रशाला कोल्हापूर येथे द्वितीय क्रमांक पटकावला.
Advertisements
तिने व्यसन सोशल मीडियाचे पालटले चित्र समाजाचे व वाचन संस्कृती काळाची गरज या विषयांवर आपले विचार व्यक्त केले. तिच्या या यशाबद्दल तिला माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,रोख रक्कम, पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
Advertisements

तिला यासाठी संस्था अध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम, सचिव यशवंतराव निकम व मुख्याध्यापक व्ही. जी. पोवार यांची प्रेरणा तर जितेंद्र सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
AD1