५२ लाखांच्या अद्यावत इमारत उभारणीने कूर येथे सौदर्यात भर पडणार
मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड ता. कागल येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कूर (ता. भुरदगड) येथिल शाखेच्या सुमारे ५२ लाख रुपये खर्चाच्या अद्यावत अशा इमारतीच्या भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रम मुरगूडमधील वेदांत साहित्यातील सिद्धहस्त लेखक व आंतराष्ट्रीय प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख (काका) यांच्या शुभहस्ते शनिवार दि. २५फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे . अशी माहिती संस्था चेअरमन श्री. अनंत फर्नांडीस, जेष्ठ संस्थापक संचालक श्री. जवाहर शहा व जेष्ठ संचालक श्री. पुंडलिक डाफळे यानी गहिनीनाथ समाचारशी बोलताना दिली.
सुमारे ३५ लाख रुपये खर्चाच्या २० बाय १०० फूट जागेत सुसज्ज अशी देखणी अद्यावत इमारत बांधली जाणार असून या इमारतीमध्ये कार्यालयीन कामकाज, कँशीयर केबीन, मॅनेंजर केबीन, स्वच्छतागृह, व्यवस्थापकीय मंडळ बैठक हॉल, ट्राँग रूम व प्रशस्त असा हॉल अशी सुसज्य इमारत लवकरच आकाराला येत आहे. त्यामुळे सभासद, नागरीक व कूर गावामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. विनय पोतदार, संचालक सर्वश्री रविंद्र खराडे, दत्तात्रय तांबट, किशोर पोतदार, चंद्रकांत माळवदे (सर), रविंद्र सणगर, दत्तात्रय कांबळे, तज्ञ संचालक जगदीश देशपांडे, संचालिका सौ. सुनिता शिंदे, सौ. सुजाता सुतार, श्रीमती भारती कामत यांच्यासह कार्यलक्षी संचालक श्री. नवनाथ डवरी, शाखाधिकारी श्री. रामदास शिऊडकर आदी उपस्थित होते.