मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडमध्ये बाजारपेठ येथे ” शिवप्रेमीतर्फे लोकनेते स्व . सदाशिवरावजी मंडलिक साहेब यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष मा. राजेखान जमादार यांच्या हस्ते स्व. खासदार सदाशिवरावजी मंडलिक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मंडलिक साहेबांच्या आठवणीनां उजाळा देतानां जमादर साहेब म्हणाले मंडलिक साहेबांचे काम हे अजरामर असे होते.
मंडलिक साहेब कागल तालुका व कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम जनता हीच आपले घर व कुटूंब समजून आपले आयुष्य गोर- गरीबांची कामे करण्यात खर्ची घातले. कोल्हापूर जिल्ह्यात शाश्वत असा विकासाचा पाया रचला गेला. कोल्हापूर जिल्ह्यात एकही असे गाव नाही विकासाविना वंचीत राहिले असेल . प्रत्येक गावा- गावात शाळा, रस्त्ये, समाजमंदिरे अशी अनेक चांगली कामे त्यांनीं सहकार क्षेत्रात केली.
सदाशिव मंडलिक साखर कारखान्याची स्थापना केली. आणि आदर्श कारखानां म्हणून ख्याती मिळवून दिली. ज्यानां पिठाची गिरण चालवता येत नाही असे म्हणणाऱ्या लोकानां कारखान्याचा आदर्श साहेबानीं लोकांच्यापुढे ठेवला. हा कारखानां ऊत्तम प्रकारे चालवून दाखविला. अशी अनेक कामे त्यानीं आपल्या राजकीय कारकिर्दीत केली.
मंडलीक साहेब आपल्यात नसले तरी कोल्हापूर जिल्हयातील राजकारणात, समाजकारणात, गोरगरीबांचे कल्याण करणारे मंडलिक साहेब सर्वांच्याच आठवणीत अमर राहतील.
यावेळी श्री .धोंडीराम परीट (जय महाराष्ट्र), विकी साळोखे यानीही साहेबांच्या एकेक आठवणीनां उजाळा दिला .
या अभिवादन प्रसंगी सदानंद मिरजकर , विशाल सुर्यवंशी , अमर कापशे, राहूल सुर्यवंशी, अमर सणगर , पिंटू रणवरे , आनंदराव गोरूले , राजू खैरे , शशी दरेकर , शिवाजी रावण , मकरंद धर्माधिकारी , तुकाराम शिंदे , अभी सुर्यवंशी ,
आशिष मोर्चे , निवृत्ती वंडकर ( गुरुजी ) , शिवाजी चित्रकार , मंडलिक साहेब प्रेमी मोठया प्रमाणात उपस्थित होते .