मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल बाजारपेठ येथिल शिवप्रेमीतर्फे स्व . खासदार ” सदाशिवरावजी मंडलिक ” साहेबांचा ८ वा स्मृतिदीन साजरा करण्यात आला. काल झालेल्या जागतिक महिला दिन डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या उपस्थितीत मंडलीक साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
मंडलिक साहेबांच्या फोटोचे पूजन सौ .ललिता सोमनाथ यरनाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. फोटो पूजनानंतर दोन मिनिटे स्तब्धता पाळून मंडलीकसाहेबानां आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यानीं साहेबांच्या अनेक आठवणी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या . शिवभक्त धोंडीराम परीट ( जय महाराष्ट्र ) यानीहीं आपल्या मनोगतात साहेबांच्या आठवणीनां उजाळा दिला.
या अभिवादन प्रसंगी सौ. दमयंती गिरी (मॅडम), अरुंधती साळोखे , प्रियांका मिरजकर, उज्वला गिरी , मंगल गोरुले , शितल धुमाळ, शुभांगी गवाणकर, स्नेहल मोर्चे , सृष्टी चित्रकार, अनुराधा गवाणकर, काशिबाई चित्रकार, बाजीराव गोधडे, शशी दरेकर, सोमनाथ यरनाळकर ,विशाल सुर्यवंशी , उद्धव मिरजकर , सनी गवाणकर , गणेश कुडवे, रोहित कोळेकर, सागर चौगले, बंटी गवाणकर, अमित दरेकर, विकी साळोखे यांच्यासह महिला, नागरीक उपस्थित होते.