मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता – कागल येथे अप्पर तहसिलदार कार्यालय मंजूर करावे अशी मागणी मुरगूड व परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी खास . संजय मंडलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की मुरगूड, बिद्री, कापशी , लिंगनूर या चार मंडल कार्यालयातील लोकांना कागल येथे आपल्या शासकीय कामकाजाकरीता जावे लागते. कागल पासून मुरगूड, बिद्री, कापशी , लिंगनूर या परिसरातील लोकांना शासकीय कामकाजासाठी कागल ला सुमारे ३५ ते ५० कि.मी. इतके अंतर जावे लागते . त्यामुळे लोकांचा वेळ वाया जावुन आर्थिक खर्चही वाढतो.
यासाठी मुरगूड हे मध्यवर्तीय शहर असून याठिकाणी अप्पर तहसिलदार कार्यालय झाल्यास साधारण ५० ते ६० खेडयातील लोकांची सोय होणार आहे. त्यामुळे लोकांची कामे जलद गतीने होणार आहेत. म्हणून मुरगूड याठिकाणी अप्पर तहसिलदार कार्यालय मंजूर व्हावे अशी मागणी
निवेदना द्वारे खास. मंडलिक यांच्याकडे केली आहे.
निवेदन देताना नामदेवराव मेंडके, प्रा संभाजी मोरे, जयसिंगराव भोसले, सर्जेराव पाटील, नारायणराव मुसळे, दत्तात्रय मंडलिक, शिवाजी चौगले, सुहास खराडे, दिपक शिंदे, अमित पाटील, दिपक कुंभार, संजय चौगले, धिरज सातवेकर, विनायक मुसळे, एस. एन. आंगज, सुनिल मंडलिक, प्रल्हाद भोपळे, विश्वनाथ करडे, धोंडीराम एकल उपस्थित होते.