महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना

कोल्हापूर, दि. 27 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर मार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहे. सन 2022-23 अर्थिक वर्षाचे उदिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जाती मधील महार, नवबौध्द, हिंदू खाटीक, वाल्मीकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम, बेडाजंगम, भंगी या प्रवर्गामधील लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापन एस. एम. पवार यांनी केले आहे.

Advertisements

अनुदान योजना- उद्दिष्ट – भौतिक 80, आर्थिक 8 लाख रुपये ही योजना 50 हजार पर्यंत असून त्यामध्ये 10 हजार रुपये अनुदान म्हणून व 40 हजार रुपये पर्यंत बँक कर्ज लाभार्थीला दिले जाईल.

Advertisements

बीजभांडवल योजना – उद्दिष्ट – भौतिक 80, आर्थिक अनुदान 8 लाख व बीजभांडवल 40 लाख ही योजना 50 हजार ते 5 लाखापर्यंत असून बँकेची रक्कम 75 टक्के, लाभार्थीचा सहभाग 5 टक्के, महामंडळाचे बीजभांडवल 20 टक्के व अनुदान 10 हजार रुपये दिले जाईल.

Advertisements

प्रशिक्षण योजना- उद्दिष्ट- भौतिक 80, आर्थिक 24 लाख ही योजना अनुसूचित जातीच्या लाभधारकांना व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधित व्यवसाय सुरु करण्याकरीता विविध व्यावसायिक ट्रेडचे शासनमान्य संस्थेमार्फत 3 ते 6 महिन्यापर्यंत प्रशिक्षण देण्यात येते. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दूरध्वनी क्रमांक 0231-2663853 या कार्यालयाशी संपर्क साधावा.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!