मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील शहर पत्रकार भवन वास्तु प्रवेश सोहळा रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी मुरगूड येथे पार पडणार आहे. गेली अनेक वर्ष पत्रकारांच्या स्वप्नातील हे पत्रकार भवन मुरगूड नगरपरिषद आणि सन्माननीय देणगीदार यांच्या बहुमोल सहकार्यातून उभारले आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उभारले जाणारे हे पहिलेच पत्रकार भवन असल्यामुळे राज्यभर या पत्रकार भवनाची चर्चा असल्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

बस स्थानकासमोर मुरगूड मधील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेले हे पत्रकार भवन खऱ्या अर्थाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीला कृतीतून अभिवादन देणारे ठरले आहे.अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र शिंदे,उपाध्यक्ष राजू चव्हाण, सचिव प्रवीण सुर्यवंशी, बांधकाम समिती चेअरमन महादेव कानकेकर यांनी दिली.
या सोहळ्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, पोलीस,अध्यात्मिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.