गोकुळ शिरगाव पोलिसांची मोठी कारवाई: ७ चोरीच्या मोटरसायकली जप्त, ₹१.२९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) :

Advertisements

गोकुळ शिरगाव पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत एकूण ₹१,२९,५०० किमतीच्या ७ चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे गोकुळ शिरगाव व कागल पोलीस ठाण्यातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

Advertisements


स्थानिक रहिवासी अजित मधुकर काटे यांच्या ₹३५,००० किमतीच्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार गस्त वाढवण्यात आली.गस्तीदरम्यान, पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की आरोपी मलेशा रावसाहेब येळगुडे (वय २४, रा. गोकुळ शिरगाव, मूळ रा. नाइंग्लज, कर्नाटक) नरसिंह सर्व्हिसिंग सेंटरजवळ येणार आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आणि तपासणी दरम्यान चोरी गेलेली मोटरसायकल हस्तगत केली.
अधिक चौकशीत आरोपीने आणखी ६ मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी एकूण ७ मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत ₹१,२९,५०० आहे.

Advertisements


ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक टी. जे. मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम शेख, संदेश कांबळे, महादेव गुरव, दीपक मोरे, अमर पाटील, भरत कोरवी, विनोद कुंभार, इजाज शेख, दिलीप ईदे आणि रितेश कांबळे यांच्या पथकाने केली.


या कारवाईमुळे परिसरात पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून चोरीच्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.असे मनोगत स्थानिक नागरिक करत आहेत.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!