कागल प्रतिनिधी सांगनी सुनेगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर):
उजना मिल्क प्रोडक्टस् प्रायव्हेट लिमीटेड या प्रतिष्ठित डेअरीस गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीप्रसंगी अहमदपूरचे माजी सहकार राज्यमंत्री बाळासाहेब जाधव व अविनाश जाधव यांनी त्यांचा औपचारिक सत्कार केला.

यावेळी नविद मुश्रीफ यांनी डेअरीच्या विविध यंत्रणा व कार्यपद्धतींची सविस्तर पाहणी केली. दूध संकलन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती डेअरीचे मॅनेजर संदिप पाटील यांनी दिली. त्यांनी डेअरीच्या दैनंदिन कामकाजाबाबत माहिती देताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांशी असलेली निगडीतता आणि गुणवत्तेची काळजी यावर भर दिला.

उजना डेअरीचे चेअरमन म्हणून. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील कार्यरत आहेत. तसेच अविनाश जाधव व . सुरज पाटील हे संचालक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू), शशिकांत पाटील चुयेकर, प्रा. किसन चौगले सर, गोकुळ डेअरीचे जनरल मॅनेजर अनिल चौधरी, वरिष्ठ दूध संकलन अधिकारी सर्जेराव पाटील (माणकर) व मार्केटिंग अधिकारी मी. शिवाजी चौगले उपस्थित होते.