मुरगूडमध्ये प्रचाराचा नारळ फुटला.
मुरगूड ( शशी दरेकर )
मुरगूड मध्ये एकहाती मुश्रीफ गटाची आतापर्यंत सत्ता कधीच आली नाही त्यामुळे विकासनिधी देताना मर्यादा येत होत्या. या निवडणुकीत शहर विकासासाठी आमच्या सर्व २१ जागा विजयी करा मुरगूडला स्वर्ग केल्याशिवाय राहाणार नाही असे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
ते मुरगूड येथे राष्ट्रवादी व छ. शाहू आघाडी युतीचा प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शाहू ग्रुपचे समरजित घाटगे. गोकूळचे माजी अध्यक्ष रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले,समरजित घाटगे यांच्यासी आपली युती ही तालुक्याच्या विकासासाठी आहे. ही युती फेव्हीकॉल ची नाही तर वेल्डिंग सारखी झालेली आहे. ती तुटणार नाही.या युतीला कोठेही दृष्ट लावू देवू नका. बारा वर्षाचा संघर्ष आता गंगार्पण करून सर्वांनी हातात हात घालून विकास कामाला लागा असे आवाहनही त्यांनी केले.
शाहू ग्रुपचे समरजित घाटगे म्हणाले कागलप्रमाणेच मुरगूड शहराच्या विकासासाठी आम्ही कटीबद्द आहोत. नागरिक मतदारांनी या शहराचा विकास करणाऱ्यांना साथ द्यावी नगराध्यक्षपदाचे उमेदवार हा कर्तबगार घराण्यातील असल्याने त्यांचे कर्तृत्व ओळखून आशिर्वाद द्या.
यावेळी स्वागत रणजित सुर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले.
यावेळी आघाडीच्या सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी मुश्रीफ व घाटगे गटाचे प्रमुख कार्यकर्ते, नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.