कागल मध्ये गारमेंटला आग, पन्नास लाखाचे नुकसान

कागल  प्रतिनिधी : कागल शहरात आंबेडकर नगर येथे गारमेंट शॉप आहे.ती शॉपी मध्यरात्रीच्या सुमारास  भीषण आगीत भस्मसात झाली. यामध्ये  रुपये ५० ते ६० लाखांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुरज विक्रम कामत (वय ३६, रा. आंबेडकर नगर, कागल) यांच्या मालकीचे दोन मजल्यांचे गारमेंट आहे .ते  आगीच्या भक्षस्थानी पडले. या दुकानात बर्मुडा व ट्रॅक सूटचे उत्पादन चालत होते.

Advertisements

            शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, प्राथमिक तपासात इतर कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नाही. सदर गारमेंट युनिटमध्ये रेडीमेड बर्मुडे, ट्रॅक सूट, कच्चा माल, कापड, तसेच उत्पादनासाठी लागणाऱ्या मशिनरी होत्या .आग एवढी भीषण होती की संपूर्ण यंत्रसामग्री व साठा जळून खाक झाला.

Advertisements

               या घटनेनंतर पोलीस प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, आणि आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisements

        कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे यांनी सांगितले की, “घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, याप्रकरणी जळीत नोंद केली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.”            घटनास्थळी स्थानिक नागरिक, व्यापारी, व पोलीस यंत्रणा सतर्कपणे कार्यरत होती. प्रशासनाकडून नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येत आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!