मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल नवी पेठ येथे
९ / २ /१९९७ रोजी प्रतिष्ठापना झालेल्या ” आत्मरुप गणेश मंदीरात ” विविध धार्मिक कार्यक्रमानी गणेश जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
सकाळी “श्री ” मूर्तीस दुग्धाभिषेक,गणेशायन व पालखी सोहळा मिरवणूक मोठया भक्तीमय वातावरणात व टाळ मृदूगांच्या तालात मोठया उत्साहात पार पडली.
दुपारी १२ वाजून १७ मिनिटानीं गणेश जन्मकाळ, महापूजा, आरती , सुंठोडा वाटप असा विधिवत कार्यक्रम पार पडला .
उद्या गुरुवार दि .२६ / १ / २३ रोजी होमहवन व सोजी प्रसादाचे वाटपाचे आयोजन करण्यात येणार आहे . भक्तानीं प्रसादाचा लाभ घ्यावा असे आत्मरूप गणेश मंडळाने आवाहन केले आहे .
या गणेश जयंती सोहळ्यात ” आत्मरूप गणेश मंदीराचे सदस्य , नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाचे सदस्य व मुरगूडमधील नागरीक , महिला मोठया संख्येने सहभागी झाले होते .