जागांचे बलाबल
शिवसेना १३ नगराध्यक्षासह, भाजपाच्या ४, राष्ट्रवादी ३ आणि शाहू आघाडी १
मुरगूड ( शशी दरेकर )
मुरगुड नगर परिषदेचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये शिवसेनेचे माजी खासदार प्रा. संजय मंडलिक गटाने झेंडा फडकविला आहे, मंडलिक गटाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत माजी खासदार प्रा.संजय मंडलिक आणि भाजपचे नेते प्रविणसिह पाटील यांचा एक गट तर विरोधी मंत्री हसन मुश्रीफ व रणजितसिह पाटील यांचा राष्ट्रवादी गट अशी निवडणूक झाली. दोन्हीही गटनेत्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानल्यामुळे निवडणुकीला चांगलीच रंगत आली होती. या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये मंडलिक गटाने १३ तर भाजपा ४ जागा घेऊन नगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर विरोधी मंत्री मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला केवळ ४ जागेवर समाधान मानावे लागले.
मुरगूड हे मंडलिक यांचे हे होमपीच असल्यामुळे या निवडणूक निकालाकडे अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. तर मंत्री मुश्रीफ यांनी देखील ही लढाई अस्तित्वाची मानली होती. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामधे मंडलिकांनी गड शाबूत राखला. मात्र त्यामध्ये मुश्रीफ यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
मतमोजणी केंद्रावर सुरुवातीपासून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही निवडणूक निकाल शांततेत जाहीर
करण्यात आला.
माजी खासदार प्रा. संजय मडलिक म्हणाले या निवडणुकीत विरोधकांनी पैशाचा प्रचंड वापर केला. मंडलिकांना एकटे पाडणे एवढे सोपे नाही पुढे ते म्हणाले गड आला पण सिंह गेला आमच्या गटाचे नामदेवराव मेंडके यांचा पराभव म्हणजे गड आला पण सिंह गेला.

– माजी खासदार संजय मंडलिक –

चौकट …….
पती पत्नी पराभूत
या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार व त्यांची पत्नी तसीनम जमादार हे अनुक्रमे नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उभे होते या दोघांचाही या निवडणूकीत पराभव झाला.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी…
सुहासिनी प्रविणसिह पाटील नगराध्यक्ष पदासाठी (५१९३ शिवसेना)
प्र.१ अ) रणजीत विलास भारमल. (४९१ भाजप)
प्र.१ ब) संध्या उद्धव पाटील (३९९ शिवसेना),
२ अ विजयमाला दिपक शिंदे (५७३शिवसेना),
२ ब) सुहास पांडूरंग खराडे(६११ शिवसेना)
३ अ) गीतांजली संभाजी आंगज(४५७ शिवसेना)
३ ब) विजय मारुती राजीगरे(३३७ शाह आघाडी)
४ अ) बजरंग ज्ञानू सोनुले(५८५ राष्ट्रवादी)
४ ब) निकेलीन जेरोन बारदेस्कर(४६४ शिवसेना)
५ अ) सुनिल अनंत रणवरे (५५७ शिवसेना)
५ ब) रेखाताई आनंदा मांगले (५७६ शिवसेना)
६ अ) सुजाता जगन्नाथ पुजारी (६२५ भाजपा)
६ ब) सत्यजीत अजितसिंह पाटील(५९१ भाजपा)
७ अ) संगीता प्रकाश चौगले (५४१ राष्ट्रवादी)
७ ब) शिवाजी विठ्ठल चौगले(५९९ शिवसेना)
८अ) वैशाली विक्रम गोधडे(५४३ शिवसेना)
८ ब) राजेंद गजानन आमते(५०८ राष्ट्रवादी)
९ अ) संजीवनी राजेंद्र कांबळे(५५९ शिवसेना)
९ ब) दत्तात्रय सातापा मंडलिक(६७७ शिवसेना)
१० अ) लोकरे सुरेखा पुंडलिक(४३९ शिवसेना)
१० ब) अनिल धोंडीराम राऊत (४२५ शिवसेना)