बाल चमू सोबत साजरी केली रंगपंचमी
मुरगूड ( शशी दरेकर ):-
मुरगूड ता . कागल येथे रंगपंचमीचा आनंदोत्सव विविध भागात साजरा करण्यात आला. रंगपंचमी सणाचे औचित्य साधून मुरगुड चे माजी नगराध्यक्ष शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष बिद्री सहकारी साखर कारखान्याची जेष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी मुरगुडच्याच युथ सर्कल मंडळातील बालचमू सोबत रंगपंचमी साजरी करून रंगात रंगून गेले.
मुरगूड येथील युथ सर्कल च्या मंडळाच्या मुलांनी प्रति वर्षी प्रमाणे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या जवळ जाऊन धुलीवंदन करत शिमग्या निमित्त बोंब मारत रंगपंचमीचा आनंद व्यक्त केला त्यामुळे प्रत्येक वर्षी प्रमाणे जेवणाचा बेत आखला जातो दादाच्या कडे सर्व मुले मजा मस्ती करत पार्टी चे नियोजन जोरात करतात त्या मध्ये प्रविणदादा, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण युवा नेते पाणी पुरवठा सभापती सत्यजीतसिंह पाटील, माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार वंडकर यांच्या वतीने सर्व लहान वृध्द सदस्य आनंदाने पार्टीवर ताव मारतात.
विविध भागात बालचमूसह तरूणाई, महिलासह आबालवृद्ध विविध रंगाची उधळण करताना दिसून आले.. त्याचबरोबर अनेक भागात तरुणाई स्टेरिओ लावून गाण्यांच्या तालात तल्लीन होत रंगांची उधळण करतानां दिसून आला. यामध्ये विविध मंडळांचाही सहभाग होता.
एकंदरीत रंगपंचमीचा हा उत्सव शांततेने व उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मुरगूड पोलिसानीही चोख बदोबस्त ठेवला होता.
मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील रंगले रंगात
Advertisements