शेतकरी, व्यापाऱ्यांचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यानां निवेदन
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात दर मंगळवारी मोठा जनावरांचा बाजार भरतो.बाजारात तळ कोकण,कर्नाटक व महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणांहून येणाऱ्या जनावरांचा बाजार भरतो. मुरगूडच्या बाजारात गायी, म्हशींचा मोठा प्रमाणात व्यापार होत असतो.
तथापी गाई म्हशींना उभे करण्यासाठी किंवा वाहनातून चढ उतर करण्यासाठी ठिय्ये करणे आवश्यक आहे.
त्याशिवाय बाजारात सर्वत्र दलदल पसरलेली असून त्यावर मुरूम टाकणे आवश्यक आहे.
बाजारातील अंतर्गत रस्ते आणि जनावरानां पिण्याच्या पाण्याच्या टाक्या यांची सुविधा होणे गरजेचे आहे.
जनावरांच्या बाजारामुळे नगरपरिषदेला चांगले महसुली उत्पन्न मिळते.
वर नमूद केलेल्या सुविधा बाजारात तातडीने उपलब्ध व्हाव्यात असे निवेदन जनावर व्यापारी व शेतकऱ्यांनी मुरगूड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घार्गे यांच्याकडे दिले आहे.घार्गे यांनी निवेदन स्विकारुन पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे.
I do not even know how I ended up here but I thought this post was great I do not know who you are but certainly youre going to a famous blogger if you are not already Cheers
Hey, cool post There is an issue with your website in Internet Explorer; could you please check this? Because of this issue, many people will overlook your excellent article because IE is still the most used browser.