डिस्टिलरी व कोजन हंगाम समाप्त
कागल : बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती व वीज निर्मितीमध्ये उच्चांक निर्माण केला आहे. कारखान्याच्या या यशात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. कारखान्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते माझा यांचा सत्कार झाला. यावेळी हंगाम समाप्ती निमित्त सत्यनारायणाची पूजाही बांधण्यात आली होती.
कारखान्याचा डिस्टीलरी हंगाम ता. २० ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झाला व हा हंगाम ता. १७ जुलै २०२२ रोजी समाप्त झाला. या २६० दिवसांमध्ये एकूण एक कोटी, चार लाख, ४० हजार लिटर इथेनॉल व १४ लाख, ८० हजार लिटर स्पिरिट उत्पादन असे एकूण उत्पादन १, १९, २१,००० लिटर्स होऊन एक उच्चांक निर्माण झाला. तसेच, सहवीज प्रकल्पामधून १९ कोटी, ५० लाख, ६८ हजार युनिट वीज हंगामामध्ये उत्पादित झाली.
त्यापैकी तीन कोटी, २४ लाख, ९३ हजार युनिट वीज कारखान्याला व डिस्टिलरी साठी वापरण्यात येऊन आठ कोटी, २७ लाख युनिट वीज महावितरणला निर्यात केली. हाही कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकच निर्माण केला आहे. पुढील हंगामामध्ये एक लाख केएलपीडी इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारवाढ करणार असून ज्यूसपासून इथेनॉल करण्याबाबतचे काम सुरू झाले आहे. पुढील हंगामामध्ये असेच उच्चांक निर्माण करुया…
यावेळी सर्व विभागप्रमुख प्रमुख अधिकारी, कर्मचारी व शेतकरी सभासद उपस्थित होते. स्वागत संतोष मोरबाळे यांनी केले. जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी प्रास्ताविक केले. आभार मिलिंद पंडे यांनी मानले.