‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज ! नविद मुश्रीफ यांच्या नावाची जोरदार चर्चा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज (शुक्रवार, ३० मे रोजी) संचालक मंडळाची सभा होणार असून, या सभेत नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीला वेग आला आहे.

Advertisements

गेले काही दिवस ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्यामुळे या निवडीला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. सुरुवातीला शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव आघाडीवर होते, मात्र गुरुवारी सायंकाळी झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर अध्यक्षपदासाठी नविद मुश्रीफ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या परदेशातून नियोजित वेळेपूर्वी परतल्याने त्यांच्या नावाभोवतीचे गूढ आणखी वाढले आहे.

Advertisements

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी नविद मुश्रीफ, अंबरिश घाटगे, अमरसिंह पाटील आणि अजित नरके या नावांवर विचार करण्यात आला. सूत्रांनुसार, या बैठकीत अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यात आले असले, तरी ते अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. हे नाव आजच्या सभेत बंद पाकिटातून ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यामार्फत जाहीर केले जाईल, असे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले आहे.

Advertisements

या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ‘गोकुळ’ हा केवळ एक दूध संघ नसून, तो जिल्ह्याच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण होणार आणि ‘गोकुळ’च्या पुढील वाटचालीस कोणती दिशा मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

1 thought on “‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज ! नविद मुश्रीफ यांच्या नावाची जोरदार चर्चा”

  1. The website design looks great—clean, user-friendly, and visually appealing! It definitely has the potential to attract more visitors. Maybe adding even more engaging content (like interactive posts, videos, or expert insights) could take it to the next level. Keep up the good work!

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!