दिल्ली : आज पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ आणि गुजरात या चार राज्यांमधील पाच विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर (election commission of india) होत आहेत. केरळमधील निलंबूर मतदारसंघात काँग्रेस-नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) आघाडीवर आहे.
गुजरातमध्ये विसावदर आणि काडी या दोन जागांसाठी, पंजाबमध्ये लुधियाना पश्चिमसाठी, केरळमध्ये निलंबूरसाठी आणि पश्चिम बंगालमध्ये कालीगंजसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. या सर्व जागांवर गुरुवारी (१९ जून, २०२५) मतदान झाले होते. आता मतमोजणी सुरू असून, लवकरच अंतिम निकाल जाहीर होतील.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या निलंबूरमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने आघाडी घेतली आहे. (election commission of india) इतर मतदारसंघांचे निकाल येणे बाकी असून, त्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.