मुरगूड ( शशी दरेकर ): पूरपरस्थिती अगोदर  मुख्याधिकारी अतिश वाळुंज यानीं नागरीकांनी केलेल्या मागणीने नगरपालिका कर्मचारी, समाजसेवकांच्या सहकार्याने ओढे -नाले  स्वच्छ करून घेतल्याने नागरीकात समाधान व्यक्त होत आहे. मुरगूड शहरामधील मुरगूड कुरणी रोडवरील दत्तप्रसाद मंगल कार्यालय येथे नदी पर्यंत असणाऱ्या ओढा आणि नाल्यांची स्वच्छता  नगरपालिका प्रशासनाने करून घेतली .त्यांना मुरगूड मधील सामाजिक कार्यकर्त्यानीं हातभार लावला.

Advertisements

पावसाळ्यामध्ये या भागात मोठ्या प्रमाणात पूर येतो या भागात असलेले नाले तुंबून आणि ओढ्यात कचरा साठल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा तुंब येऊन पूर परिस्थिती आणखीन भीषण होते .या ओढ्यामध्ये व नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्यां, झुडपे यासह कचऱ्याचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. यामध्ये तब्बल दोन टनाहून अधिक कचरा काढण्यात आला . चौगुले गल्ली ते दत्त मंदिर येथील नाल्यांचा देखील यामध्ये  समावेश होता.

Advertisements

शिवभक्त समाजसेवक यांनी सोशल मीडियावर स्वच्छतेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते त्यानुसार सकाळी आठ वाजल्यापासून समाजसेवक नागरिक एकत्र आल्यानंतर नगरपालिका प्रशासन यांनी जेसीबीच्या साह्याने नाले स्वच्छता करण्यास सुरुवात  केली. तब्बल सहा तास स्वच्छता मोहीम चालली होती. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये  नगरपालिका प्रशासन यांना मुरगूड मधील सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा हातभार लागला. मध्यंतरी मुरगूड मधील समाजसेवक यांनी मुरगुड चे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्याकडे या नाले स्वच्छतेबद्दल मागणी केली होती.

Advertisements

त्यानुसार आज  समाजसेवक आणि नगरपालिका प्रशासन यांनी मिळून ही नाले आणिओढयाची स्वच्छ करून घेतली . यावेळी  मुरगुड नगरपालिका स्वच्छता निरीक्षक सचिन भोसले ,शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोतदार , नगरपालिका कर्मचारी अक्षय कांबळे, भिकाजी कांबळे , कृष्णात कांबळे स्वच्छता मुकादम बबन बारदेस्कर, तानाजी भराडे ,उदय पाटील, बाजीराव लाड. सुखदेव चव्हाण, सौरभ मोरे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी आणि समाजसेवक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

AD1

By G1 G2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!