मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्रा डॉ.शिवाजी होडगे यांची निवड झाली.
डॉ.शिवाजी होडगे यांनी याच महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून ३४ वर्ष सेवा केली असून त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये ३० शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.तीन ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य …पीएच .डी चे मार्गदर्शक म्हणून ते काम पाहतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. सध्या तीन विद्यार्थी त्यांच्या कडे पीएच.डी चे संशोधन करीत आहेत.
डॉ. शिवाजी होडगे हे जय शिवराय एज्युकेशन सर्व्हन्ट को-ऑपरेटिव्ह या संस्थेचे चेअरमन.रवळनाथ हाऊसिंग फायनान्स गडहिंग्लज शाखा निपाणी या संस्थेचे सल्लागार व .हरळी बुद्रुक ता.गडहिंग्लज येथील कै. महादेव अर्जुना होडगे सार्वजनिक ग्रंथालय या ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. भारतीय शिक्षण संस्था पुणे (आय. आय. ई)या संस्थेचे ते कार्यकारिणी सदस्य असून जिल्ह्यातील शैक्षणिक .सामाजिक. सहकार संस्थेची त्यांचा निकटचा संबंध आहे वेगवेगळ्या शैक्षणिक .सामाजिक सेवाभावी संस्थेने त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
डॉ. शिवाजी होडगे यांना जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा.खासदार प्रा. संजयदादा मंडलिक . जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा. गजाननराव गंगापुरे संस्थेचे कार्याध्यक्ष. अॅड मा. वीरेंद्र मंडलिक कार्यवाह अण्णासो थोरवत यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. डॉ .होडगे यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.